पाऊस आणि ती
पाऊस आणि ती
रिमझिम रिमझिम ती बरसात
बरसत होती तिच्या आठवात
थेंब थेंब मातीच्या काळ्या
ढिगलावर पडताच
अत्तरालाही लाजवेल
असा मृदुगंध मन धुंद करत
तिचा सहवास दरवळत होता
हातात हात घेऊन रिमझीम सरीत
धुंद एकांत शोधत होता
थेंब पावसाचा गोऱ्या गालावरून
ओघळत जणू मौक्तिक चमकदार
ओघळावा तसा तोही ओघळला
लाजून खुलली गालातच हसली
तशी गंधात मोहरली
पुन्हा त्याच पावसाच्या सरीत

