STORYMIRROR

काव्य चकोर

Tragedy

3  

काव्य चकोर

Tragedy

पाऊस आणि मी

पाऊस आणि मी

1 min
336

भिजायला कोणी नाही

तो एकटाच कोसळत राहतो...

तिला पाहण्याऐवजी 

मी त्यालाच पाहत राहतो।।


हल्ली तो काळवेळ पाळत नाही

दिवस असो वा रात्र...

तो कोसळत राहतो वेळी, अवेळी, 

अवकाळी किंवा पावसाळी

त्याचे चालूच असते सत्र।।


त्याचा प्रयत्न दिसतो

तिला भिजवण्याचा रिझवण्याचा

पण तिला त्याचा गंध नसतो

त्याच्या भावनेवर मात्र

तिच्या मनाचा प्रतिबंध दिसतो।।


एकीकडे ती मश्गुल दिसते

सजण्या-सवरण्यात

तिच्या मनाच्या भावविश्वात

तर दुरीकडे 

तो अविरत कोसळत राहतो

मी स्तब्ध होऊन त्यालाच पाहत असतो।।


कधीतरी मोकळे होते आकाश

तो किनाऱ्याचे शल्य उरात ठेवून

नदीच्या वाटेने निघून जातो

पण तरीही मी त्याला पाहत असतो

तो पापणीतून माझ्या ओघळत राहतो।।



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy