STORYMIRROR

Sarika Jinturkar

Fantasy

3  

Sarika Jinturkar

Fantasy

पाऊस आणि भुट्टा

पाऊस आणि भुट्टा

1 min
10

मनाला आकर्षित करणारी 

पाऊस आणि भुट्टाची जोडी  

रस्त्याच्या कडेपार थांबबावी 

 गाडी मागे वळून थोडी


 चिंब पावसात भिजून

 मस्त गाठावा टपरीचा कट्टा

 आवर्जून आस्वाद घेण्या

 चाखावा गरम- गरम भुट्टा 


टपोऱ्या पिवळ्या मोत्यांची

 कणस ही दाणेदार

 लाल निखाऱ्यांवर भाजलेल्या

 मक्याचे रूप दिसे शानदार 


तिखट- मीठ, लिंबाच्या लेपाने 

भारीच की हो स्वाद 

रिमझिम पावसात भुट्टाला

 द्यावी वाटते मनापासून दाद..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy