STORYMIRROR

UMA PATIL

Fantasy

3  

UMA PATIL

Fantasy

पाऊलखुणा

पाऊलखुणा

1 min
14.4K


जुन्याच वाटांवरचे

जुनेच रस्ते, जुन्या पाऊलखुणा

नव्याने शोधते आज मी.....



काय मिळवले ?

काय गमावले ?

माझ्यात असलेल्या मी पणाला

नव्याने शोधते आज मी.....



अनोळखी लोकांची,

अनोळखी गर्दी

बघतेय कोणी ओळखीचा दिसतो का ?

जुन्या वाटांवरच्या,

जुन्या पाऊलखुणा,

जुनी झाडे उगवलेली,

जुनाट माती,

जुनीच झुडूपे.....

एक इवलंसं रोपटं जे नवीनच उगवलंय अशा रोपट्याला शोधते मी.....



गजबज, शहरात गोंधळच गोंधळ

बघतेय कोणाची कुजबूज पडते का कानी ? सभोवतालच्या गोंगाटात

स्वतःच्या मनाची हरवलेली शांतता शोधते मी.....



विजयाची पदक,

गौरव सन्मान,

जिंकल्याचे पुरस्कार,

प्रमाणपत्र अशा सर्व बक्षिसांमध्ये

स्वतःच्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा शोधते मी.....



रणरणते ऊन,

मध्यान्हीचा सूर्य,

तापलेली जमीन,

उकाडा

बघते झाडाची सावली मिळते का ?

कडाक्याच्या उन्हात पावसाचा एक थेंब शोधते मी.....



शहरात रस्त्यांवर माणसांची गर्दीच गर्दी,

सगळीकडे माणसंच माणसं

अशा गजबजलेल्या रस्त्यांवर

एकातरी हक्काच्या माणसाच्या पाऊलखुणा शोधते मी.....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy