पाऊल
पाऊल
अठराव्यात तिनं पाऊल टाकलं
प्रेम माझं तिच्यापुढे आज वाकलं
तिच्या रुबाबाला माझं मन भिडलं.....
कळलं ना मला हे कसं कधी घडलं
माझं हसतं खेळतं जीवन बिघडलं......
पाहून तिची साधी भोळी अदा रंगीन
सावळ्या रंगाचा झालो मी हो शौकीन
माझं मन हो तिच्या आठवणींत सडलं.....
इंस्टाग्रामवरची पाहून मी तिची डीपी
माझ्या प्रेमाची हळूच वाढू लागली बीपी
माझं काळीज हो आज तिच्या हारी पडलं.....
माझ्या नावाचा हो ती करते तिरस्कार
संगमच्या शायरीला ती करते नमस्कार
वेड्या राजाचं मन आज राणीवर जडलं.....

