STORYMIRROR

sarika k Aiwale

Romance Tragedy Fantasy

3  

sarika k Aiwale

Romance Tragedy Fantasy

पाठलाग...

पाठलाग...

1 min
214

अठवणी करती पाठलाग

फिरुनी येते साद कानी

पाठलाग करती आठवणी

ओळखीची ती वाट नव्यानी

पाऊले चालता सोबतीनी

गर्द निळ्या आभाळी रमुनी

काव्यात शब्द पाखरे होउनी

डायरीतले वाचता पत्रे जुनी

गुंतता हृदय हे  पानोपानी 

फिरुनी येते साद कानी

पाठलाग करती आठवणी

ओळखीची ती वाट नव्यानी

पाऊले चालता सोबतीनी

गहिर्या होताच सावल्या मनी

मनी  आसक्तीचे पाट वाहुनी

जाग्या होताच त्या आठवणी

तया अश्रु देती साथ ओघळुनी

फिरुनी येते साद कानी

पाठलाग करती आठवणी

ओळखीची ती वाट नव्यानी

पाऊले चालता सोबतीनी

गंधाळली ही रात्र नव्यानी

सोबतीचे क्षण ते आठवुणी

कण कण जगते अजुनी

क्षण ते साठवणी करुनी

फिरुनी येते साद कानी

पाठलाग करती आठवणी

ओळखीची ती वाट नव्यानी

पाऊले चालता सोबतीनी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance