STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Inspirational

4  

Meenakshi Kilawat

Inspirational

पाणी

पाणी

1 min
375

[अष्टाक्षरी]

"पाणी कसे डोळी येती"


सुर जुळाले अंतरी

अंतरीया समाधान

देवा तुझा ध्यास मला

मला तुझा अभिमान।।


तुझ्यामुळे आज मज

मज आहे तूझा लळा

उपस्थिती तूझी आहे

आहे माझा तू सावळा ।।


जनासाठी किती माया

माया करितो अपार

दु:ख दु:खीतांचे हरे

हरे कैवल्य दातार ।।


पाणी कसे डोळी येती

येती नेत्रात कोठूनी

आंनदाचे मोर नाचे

नाचे गात्रात भरूनी ।।


प्रेम जपलय मनी

मनी उल्हास सभेत

श्वास सुगंधानी भरे

भरे फुले ही बागेत ।।


तुझे अाहे प्रेम नातं

नातं आहे भरनारी

तुझी आहे मीरा प्रिया

प्रिया गाते दरबारी ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational