पांगुळले मन
पांगुळले मन
निखाऱ्यावर आहे जीवन माझे...
धगधगते आहे मन माझे...
मला न मिळाला कुठेच आसरा...
खुप झाला नात्यांचा पसारा...
जरी असलो मी शुन्यातच जमा...
रचिल, पसरवील प्रेम समा...
कुठे कोरडेच अन कुठे दलदल...
पाहावे तिथे व्यर्थ कलकल...
रंग सर्व आता प्रितीचे गढुळले...
क्षणीकसुखाने मने पांगुळले...
निरार्थक बनले कर्माचेच मोल...
निश्वार्थ वचने, कर्तव्य फोल...
पसरले सर्वत्र विचार ते अशुद्ध...
लालच करी सत्याशीच युद्ध...
जाणवेना कुणा कुणाची व्याथा...
कितीही वाचोत ते ज्ञानगाथा...
आपुलकिचे त जणू बुडाले जग...
शुद्ध माणुसकी भोगते भोग...
