STORYMIRROR

सुर्यकांत खाडे

Others

3  

सुर्यकांत खाडे

Others

भावना बेधुंद होवुन न्हाल्या

भावना बेधुंद होवुन न्हाल्या

1 min
127

ऊन्हाची दगदग सोसत नव्हती...

लिहिन्याची तगमग मनास हाती...


ईतक्यात पावसाच्या सरी आल्या...

ह्रदय भावना बेधुंद होवुन न्हाल्या...


थेंबा थेंबात रान सारे भिजुन गेले...

शब्दा शब्दाने मन चींब चींब झाले...


मोहक सुगंध पसरले सर्व धरावरती...

सप्तरंग बिखरले वहिच्या पानावरती...


चमकीले मोती ते वाहती वादळा संगे...

थरथर कापती लेखण लिहण्यास ढंगे...


झाडे डोले, पाखरे बावरती चोहीकडे...

केले वलय शब्दांने पाहती मझ्याकडे...


गढुळ पाणी अंगनातले पळते सैरावैरा...

अक्षर अक्षर घेती कवि मनाचा आसरा...


नाचती मोर रानोमाळ होते तो गलबला...

कविता रगंल्या सार्थक झाला फलफला...


उधान वाऱ्यांचे वाढले नखरे सारे आज...

मी शब्दतंरग सोडले चढवले भाव साज...


Rate this content
Log in