आकाश चांदणी
आकाश चांदणी
बावरे जीव हा तुझ्या स्वप्नांनी,
छेडते ही मजला ती रातराणी...
तुझे कुठे ध्यान अन् कोठे मन
कळेना तुजला माझे प्रित बाण
इशारे सारे नजरेचे ग ते राणी
घायाळ ह्रदय पाहते ग केविलवानी...//1//
नटुन सजुन पुढून जातेस रोज
शृंगार, नखरे, तुझा रुबाबी तेज
अंगाचे होते माझ्या पाणी पाणी
घायाळ ह्रदय पाहते ग केविलवानी...//2//
होईल चर्चा तुझ्या ग यौवनाची
हवी तुला साथ प्रित बंधनाची
लाला खुलली, बुंधा बांधुनी
घायाळ ह्रदय पाहते ग केविलवानी...//3//
नको ठुमकत चालू पायी पैजन
वाढते माझ्या 'दिलाची धडकन'
ओढ कसली झुरतो मी साजनी
घायाळ ह्रदय पाहते ग केविलवानी...//4//
साज सजवला मी लावणीचा
कहर केलास तुझ्या मनमनीची
चमचमती तू ती आकाश चांदणी
घायाळ ह्रदय पाहते ग केविलवानी...//5//
