शब्द मनातले...
शब्द मनातले...
1 min
168
आज शब्द दाटलेले
उमटले हो ते ओठावरती...
भाव सारे ते साठलेले,
रेखाटले मी या पानावरती...
तुझासाठी ते गोठलेले,
कोरलेले होते ह्रदयावरती...
प्रेमानं ते आहे भरलेले,
नयनातले भाव पाझरती...
कोठुन, कसे, न उमगले,
पण झाले हवे भावनावरती...
नेत्र भ्रमर फिरू लागले,
भुलले त्या मुखकमळावरती...
रुपाचे चांदणे ते पडले,
गेले नाहुन, आली प्रेमभरती...
धुंद होवून प्रितीत बहरले,
भाळले माझे मन तुझ्यावरती...
