कालचक्र व निर्सग
कालचक्र व निर्सग
शितल चांदणे पसरले निशुभ्रकाशी...
नी नकळत भुरळ घाले सजीव मनाशी...
पाहते लुकलुकत चांदणी प्रियाशी...
पुर्णचंद्र प्रकाशीत करी सर्व जगाशी...
भाव प्रेमाचे पटवित या ह्रदयाशी...
देवुन संदेश प्रितीचा तो जीवनाशी...
रात्र सरली पहाट विनवी सुर्याशी...
हवे तुझे पण 'तप्तप्रेम' या भार्याशी...
डोळे उघडुन उडती पक्षी गगनाशी...
सजवली, दिली सुंदर काया व्रुक्षाशी...
मन होई हे प्रसन्न 'सुप्रभात' काळाशी...
कालचक्र ही चालते मिळून या प्रेमाशी...
नमन करू रे सारे ! मिळून त्या देवाशी...
ज्याने बनवले, फुलवले विश्व, निर्सगाशी...

