STORYMIRROR

सुर्यकांत खाडे

Others

2  

सुर्यकांत खाडे

Others

धुळीतले शब्दभाव

धुळीतले शब्दभाव

1 min
73

कश्याला छापायची पुस्तके

धुळीत पडतात सारे...


भावनांना येथे नसे मोलच

ह्रदयास न मिळे निवारे...


किंमत कुठे उरली त्यांना

ते शब्द रडतात बिचारे...


सत्य समजावुन जगातले

तेही होतात हो पसारे..


वचनांचे नुसतेस उरलेत

कामा पुरतेच साचा रे...


मन फिरे भिरभिरा सर्वे

बनुन मोकाट ते वारे...


वादळ शांत होईना कुढते

कुचकामी झाले विचारे...


अंत होईना समस्यांचा तो

समिक्षा न जमे कोणा रे...


बुडवलेत हित स्वत:चेच 

स्वहाताने तू मानवा रे...


हुडकीतोस मानपान का

भुलतोस मृगजळा रे...?


साहित्या गुदमरून चाले, 

बनले पिसाट वाचा रे...!


मरणं ना, म्हणून भाव जगे,

"तू ते समजुन घे जरा रे...!!"


Rate this content
Log in