रोपटे झाड झाले
रोपटे झाड झाले
1 min
171
घराच्या खिडकीत
मी एक रोपटे लावले,
घरच केले त्याने या मनात...
प्रेमाने होतो ते वाढत
भाव त्याच्यावरी जडले,
तेही जाता जाईना वनात...
ठेवुन काळजावर दगड
हळूच मग मी दुर केले,
अन नेवुन रोवले ते रानात...
छोटे हिरवे चार पानं
विशालकाय ते झाले,
आणि बहरले पर्यावर्णात...
पसरून पाने फद्यावर
शितल छाया देवू लागले,
होऊ लागले सार्थ आतोनात...
मोठ्या मधुर फळांनी
आता तेही वाकु लागले,
नी गेले भरत ते भावनात...
एक छोटेसे कोमल
मोठे महान झाडं झाले,
मला केले सम्रुद्ध जीवनात...
