STORYMIRROR

सुर्यकांत खाडे

Others

4  

सुर्यकांत खाडे

Others

अंगणातला पाऊस

अंगणातला पाऊस

1 min
391

ओळखीचा आहे पण,

अनोळखीसारखा वाटतो...


अंगणातला हा पाऊस

सदा नसांगताच येतो जातो...


कधी कधी रागावुन

जोरात धो धो बरसतो...


तर कधी प्रेमात रमुन

थेंबाथेंबान टिप टिप पडतो...


बाहेरच्या सर्वांनाच मात्र

नेहमीच तो ओलेचिंब करतो...


कितीही रंगात असला जरी,

तरी दारा बाहेरच थांबतो...


गवत, पानफुलावरची

धुळ धुवुन सुंदर चमकवतो...


मस्तीत येवुन कधीतर

मातीत, नदीनाल्यात लोळतो...


कधी दवबिंदू बनुन

मोत्यासारखा चमकतो...


अंगणातला हा पाऊस

सदा नसांगताच येतो, जातो...


कपडेे अंग ओले करतो,

पण ओलाव्याने मन भुलवतो...


अंगनाकला हा पाऊस....



Rate this content
Log in