STORYMIRROR

सुर्यकांत खाडे

Others

2  

सुर्यकांत खाडे

Others

न दिसणाऱ्या झळा...

न दिसणाऱ्या झळा...

1 min
83

सुर्यही आज बेभान होऊनच चढत होता...

रखरख उन्हाची आगच तो ओकत होता...


पोळत होत्या न दिसणाऱ्या त्या झळा...

घामाने सर्व अंगाच्या बदलविल्या कळा...


कसे काम करावे शरीरास काही कळेना...

भुक पोटाची, ताहान ओठांची ही मिटेना...


आधुन मधुन ढग देत होते हो आसरा...

जीवाचा झाला होता नुसताच कचरा...


कष्ट केल्याशिवाय कसे मिळेल पोटा...

त्यावर जाळीत होता मन मुल्य तोटा...


मोल सारे पडलेल पाहुन ते शेतमालांचे...

फास लटकत होते झाडास शेतकऱ्यांचे...


कर्जाचा डोंगर जगु काही देत नव्हता...

माणूस्किचा झरा कुठच वाहात नव्हता...


त्यातूनच ती वाढलेली बेचव महागाई

पायपीटी करत होती भावनांची लाही


हातांच्या फोडांची का किम्मत शुन्य मिळे?

पाहुन रिकामा खिस्सा गिळते टुकडे शिळे!


रंग हिरवळीचे सर्वच उडाले; पाहा रे "मुरारी"!

"बळीराजा" झालाय आता दारुण 'भिकारी'!


Rate this content
Log in