पांढरा रंग गझल गुन्हा झाला
पांढरा रंग गझल गुन्हा झाला
मौनात बरा होतो बोलून गुन्हा झाला
दुनियेस खरे माझे सांगून गुन्हा झाला
प्रेमात सखी माझा बेकार बळी गेला
विश्वास तुझ्यावर मी ठेवून गुन्हा झाला
साधे जगणे माझे त्यांना पचले नाही
छोटे घर गवताचे बांधून गुन्हा झाला
दैवात असे माझ्या वैशाख भडकलेला
स्वप्नात वसंताला पाहून गुन्हा झाला
टाळून सुखे गेली फोडून कपाळाला
आयुष्य उन्हामध्ये जाळून गुन्हा झाला
