STORYMIRROR

Saroj Gajare

Inspirational

3  

Saroj Gajare

Inspirational

ओव्या माझ्या सावित्रीच्या

ओव्या माझ्या सावित्रीच्या

1 min
1.5K



पहिली माझी ओवी ग वाहिली तुझ्या कष्टांना

अंधारातून प्रकाशिले,शूद्रातीशूद्र स्रियांना

अडाणी तू शिकलीस ग,जेव्हा शिक्षक गावेना

सगुणाई संग तुही, लागलीस की ग शिकवायला ।।१।।


दुसरी माझी ओवी ग, तुझ्या त्या हिंमतीला

शेणगोटे ,शिव्या खाऊनही, माघार न घेण्याला

सासऱ्यांनी त्यजिले, घराबाहेर काढीले

तरी ना डगमगली, पती साथ ना सोडली।।२।।


तिसरी माझी ओवी ग, तुझ्या प्रेमळ स्वभावाला

दूर लोटलेल्या विधवांचा सांभाळ तू केला

निराधार अनाथांची, आई ग तू झालीस

काशीबाईच्या यशवंतास, दत्तक तू घेतला ।।३।।


चवथी माझी ओवी ग, तुझ्या त्या निष्टेला

वैरी झाले बाप-भाऊ,टाकले वाळीत तुम्हाला

वदलीस बुद्धी कोती, गोंजारती गाई कुत्र्याला

माणसावाणी माणसं ती, विटाळ होतो तुम्हांला ।।४।।


पाचवी माझी ओवी ग, तुझ्या चतुरस्र बुद्धीला

दुर्बलांच्या संसारासाठी, स्वसंसार सोडीला

ओघवत्या वाणीतून,भाषणं 'काव्यफुलें' लिहिला

साऱ्या आयुष्याचा तो,तेज:पुंज यज्ञकुंड पेटला ।।५।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational