STORYMIRROR

PANKAJKUMAR THOMBARE

Romance

3  

PANKAJKUMAR THOMBARE

Romance

ओठांनी

ओठांनी

1 min
189

आणली आहे नशा मिलनात ओठांनी

धुंद झाली पावसाची रात ओठांनी


स्वर्ग अवतरला जसा साक्षात पृथ्वीवर

अमृताची सारखी बरसात ओठांनी 


शायरी शिकलो तुझ्या मोहात लावण्या 

शेर म्हणतो घे जवळ प्रेमात ओठांनी


तू सुगंधी बाग माझ्या प्रेम राज्याची 

दे गुलाबी ओठ तू ओठात ओठांनी 


वाद सारे संपले एकाच भेटीने 

गोडवा हा आणला दोघात ओठांनी 


जीवनाला रंग देऊ आज प्रेमाचे 

इंद्रधंनुच्या रंगुया रंगात ओठांनी 


त्रासलो आहे जगाच्या वास्तवाने मी 

स्वप्ननगरी बांधुया सत्यात ओठांनी



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance