STORYMIRROR

AnjalI Butley

Abstract Inspirational

3  

AnjalI Butley

Abstract Inspirational

ऑक्सिजन

ऑक्सिजन

1 min
216

घरीच तुळशीचे झाडे होती

वृंदावनही खास त्यास

रोज सकाळ संध्याकाळ

पाणी टाकुन दिवा लावुन

नमस्कार करत प्रदक्षिणा घालतं

मिळवत होतो ऑक्सिजन फुकट!

पण लागलो देखाव्यापाठी 

हाय फाय भासवण्यास

उपटून टाकले तुळशीचे झाडे

ऊखडले वृंदावन ही!

घेतली जागा त्याची

रंगीबेरंगी विलायती झाडांनी

किंमती महागड्या फॅशनेबल

पॉटात मिरवती चार झाड!!

करोना बाधितांना आता लागतोय

ऑक्सिजन धगधग ठेवण्या जीवन

फिरतो मिळवण्या ऑक्सिजनसहित बेड

ह्या हॉस्पिटलात तर त्या हॉस्पिटलाच्या

दारोदारी!!

मिळेना ऑक्सिजन मग मृत्यू गाठतो

तर ऑक्सिजन टँक गळतीने

२०-२५ जणांवर मृत्यू गाठतो!!

उघडा डोळे वाचा निसर्ग

तुळस लावा दारोदारी

हॉस्पिटला जवळ

राखा पावित्र्य पुजून तिचे

मिळवा परत ऑक्सिजन फुकट!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract