STORYMIRROR

VINAYAK PATIL

Abstract Inspirational

3  

VINAYAK PATIL

Abstract Inspirational

ओंजळ

ओंजळ

1 min
255

ओंजळ रिकाम्या हाताची 

दर्शविते सारे काही 

पकड त्याची सैल होताच

बाकी उरे न‌ काही 


हे विश्वची माझे घर

न‌ मावे या ओंजळी 

निसटे त्यातून सारे 

अश्रु नयनी ओघळी 


ओंजळीतून दान द्यावे 

न राहो कोणी रिकामी 

हेवेदावे विसरूनी सारे 

जीवन लागो सत्कर्मी 


सागराचे पाणी घेता 

हाती भरे ओंजळ माझी 

त्यातील प्रतिबिंबाने होई

पुरती फसगत माझी 


झाली ओंजळ रिकामी 

सुगंध तसाच राहतो!!

कितीही विसरुनी आठवणी

मनात सुगंध दरवळतो!! 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract