ओढ पावसाची
ओढ पावसाची
ग्रिष्माचा चढतोय पारा
भेगांमधूनी कुढत जाई..
उजाड झाले शिवार सारे
रूजणे केव्हा कळत नाही
वावटळाचे आक्रंदन, घालते घिरट्या
झेप आकाशी पेलत नाही
उनाड वाहतोय पानांमधूनी वारा
चाहूल तुझी जाणवत नाही
ओस पडलीत कातळ सारी
उमाळा ही वहात नाही..
परसातूनी चातक आवाज देतोय
व्याकूळता ऐकवत नाही
नभ देतोय गर्जूनी साद
प्रतिसाद तुझा आलाच नाही
सोडून दे लपाछपीचा खेळ
अजून का कोसळत नाही
पुन्हा भेटण्या आस देऊनी
वियोगता सोसवत नाही
सांग तुला रे कशी आळवू
भान तुला कसे नाही..
आतूर झाले तुला भेटण्या
तुझ्याविना मोहरणं जमलंच नाही
गत काळाच्या आठवांमधूनी
तुझं बरसणं संपलंच नाही
संपलंच नाही....