ओढ निळी ती
ओढ निळी ती


श्यामल वेळी
त्या तरु खाली
किती दिसानी
साजण भेटला ..१..
तुझ्यासारखी
उरात होती
निळी ओढ ती
मला धावत्या जला ..२..
फुलत्या रात्री
मिटली नेत्री
कोमल गात्री
माझ्या चंद्रकला ..३..
मी शिकले गं
बाहुपाशी त्या
नच शिकवता
शृंगाराच्या कला ..४..
एकरूपता
दोन जीवनी
रक्तामधूनी
कापूर पेटला ..५..