नयनमोहर गुलमोहर
नयनमोहर गुलमोहर
लागता वसंत ऋतूची चाहूल
गुलमोहर ग्रीष्मात बहरतो
आद्य ऋग्वेदातही राज्यवृक्ष
अगदी मनाला वेड लावतो ||
सोन्याच्या दागिन्यांनी खरा
नखशिखांत असा नटलेला
अंगाखांद्यावरून सोनपिवळ्या
दागिन्यासारखा बहरलेला ||
उभा राहून तळपत्या ऊन्हात
नाजूक पालवी नयनमोहर
गुलमोहराची नजाकत फार
किती सुंदर हा अविष्कार ||
सडा केशरी रंग चोरुनी
शेंगाही तलवारीच्या आकार
गंधीत झाले रान खुळे सारे
सजली वेडी सृष्टी साकार ||
मोहरणे नव्याने पुन्हा-पुन्हा
उन्हं सगळे माथ्यावर घेऊन
जणू साज सौंदर्याचा घालून
भान कर्तव्याचे सावली देऊन ||