नये नये प्रेम मावाली
नये नये प्रेम मावाली
वाटल लय भारी
त्याच्या संग कराव
म्हनलं येखादी वारी
फटफटीवर त्याच्या
माग बसून फिराव शहर
पण बापच आला मधात
झाला मग कहर
कालीजाच्या बाहेर त्यो
वाट पाहे मावाली
चोरुनच नजर टाको
सोबतिन होती ना मावाली
पाणी भरासाठी जावो
गुंड घेऊन हापशीवर
ड्रेस नाही घालो आमी
ऱाहो फुल मँक्शीवर
आज कयते कायजी
मायबाप काय असते
पण राजेहो तरीही
जीव तं प्रेमासाठी रुसते
