नव्या युगाची जननी
नव्या युगाची जननी
आदि काळापासूनची
काय वर्णावी महती
कधी नव्हती अबला
सर्व जग ची जाणती
नाव चमकले जगी
जेथे टाकीते पाऊल
सर्व क्षेत्रात यशाची
तुज लागते चाहुल
आहे सशक्त महिला
अशा अनेक सबला
झाशी मर्दानी होतीच
नका संबोधु अबला
पहा देवीच्या रुपात
मन होते सदा दंग
नव्या युगाची जननी
आगळाच तुझा रंग
आहे तुझ्यात कर्तृत्व
घेण्या नभात भरारी
नव्या युगाची जननी
राहो मनात उभारी
प्रगतीच्या पथावर
सदा ठेव तू पाऊल
पहा ती झळकतील
देण्या यशाची चाहुल
सर्व क्षेत्रात दिपावी
तुझ्या उन्नतीची किर्ती
मिळो तव प्रयत्नांना
पूर्णपणे स्वप्नपूर्ती
नवी स्वप्ने नवी दिशा
कर विश्व पादाक्रांत
जगज्जेता तू होशील
हरण्याची नको भ्रांत
आहे मोकळे आकाश
करुनिया ती हिंमत
घेता नभात भरारी
जगा कळेल किंमत
