STORYMIRROR

Priyanka Bhasme

Romance

4  

Priyanka Bhasme

Romance

नववधु प्रिया

नववधु प्रिया

1 min
467

नववधु प्रिया मी बावरते

गहिवरते थोडे, थोडे सावरते,

अपरिचित तू प्रित तुझ्याशी जोडते, 

आई-बाबांच्या लाडाची मी, 

सोडून जाताना त्यांना अश्रू डोळ्यातले ओघळते, 

नववधु प्रिया मी बावरते...... 


घाबरते थोडे, थोडे आवरते,

हातात हिरवा चुडा, नाकात नथ मी तुझ्याच नावाची घालते, 

संसार माझा, तुझ्यासोबत मांडते, 

नाव तुझे ते माझ्या नावासोबत जोडते, 

साजश्रृंगार अंगावर माझ्या, मी तुझ्या नावाचा करते, 

नववधु प्रिया मी बावरते......


अडखळते थोडे, थोडे चालते,

सुख-दु:खात तुझ्या मी, माझे सुख-दु:ख मानते, 

सोडून आपले माझे, परके आपले मानते, 

विसरुन माझ्या वाटा तुझ्या वाटेवर मी चालते, 

नववधु प्रिया मी बावरते...


हरवते थोडे, थोडे शोधते,

जीवनगीत माझे, तुझ्या स्वरात गाते, 

कवितेत मी माझ्या, तुझे शब्द जोडते, 

तुझ्या आवडींना मी, माझ्या आठवणीत जोडते, 

विसरुन सारे जग, तुझ्यातच मी माझे जग ते बघते, 

नववधु प्रिया मी बावरते...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance