Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Govardhan Bisen

Abstract Others

4.5  

Govardhan Bisen

Abstract Others

नवरंग हे नवरात्रीचे

नवरंग हे नवरात्रीचे

2 mins
309


नवरात्रीच्या शुभ समयी

नवरंगाची खूप महत्ता |

या धरावर व्यापली आहे

आई दुर्गा भवानीची सत्ता ||१||


धारण करा वस्त्र पिवळा, 

नवरात्रीच्या पहिल्या दिनी |

उष्णतेचा प्रतिक हा रंग,

प्रफुल्लित करतसे मनी ||२||


दुसऱ्या दिनी हिरवा रंग, 

प्रकृतिचा राहते प्रतिक |

विकास शांति देते सर्वांना,

स्थिरतेचा भाव सटिक ||३||


तिसऱ्या दिनी करडा रंग, 

संतुलित विचार हे खास |

चौथ्या दिनी संत्रा रंग देतो, 

आम्हाला स्फूर्ति आणि उल्हास ||४||


पांढरा रंग पाचव्या दिनी, 

मिळे सुरक्षा व आत्मशांति |

सहाव्या दिनी लाल पोशाख, 

चमके उत्साह प्रेमकांति ||५||


गडद निळा सातव्या दिनी, 

भेटे सर्वांना आनंद भाव |

आठव्या दिनी गुलाबी रंग, 

देतो प्रेम, स्नेह नि सद्भाव ||६||


नवव्या दिनी जांभळा रंग, 

सकलांना समृद्धीची प्राप्ति |

धारण करा नवरंग हे, 

देवीभावाची वाढे व्याप्ति ||७||


खूप आवडतात अंबेला, 

नवरंग हे नवरात्रीचे |

करा सर्व प्रेमाने जागर, 

इच्छीत मिळे फळ खात्रीचे ||८||


भक्ती भावाने करावी पूजा,

धरुनिया व्रत उपवास |

प्रसन्न होईल अंबे माता,

आशिर्वाद देई हमखास ||९||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract