नको हा विरह आता...
नको हा विरह आता...
वाळवंट हा श्वासांचा,
जगण्यास पोळत जाते,
तुझी साथ पावसाची आस,
वेड्यामनी धरत जाते...
कोरडी कोरडी रात्र सरता,
दिवसही जळत जाते,
कुठे थांबली ना सावली,
मृगजळी धावत जाते...
क्षण आठवता पावसाचे,
चिंब चिंब भिजत जाते,
ताटातुट झाली कशी,
प्रश्न मनास पुसत जाते...
नको हा विरह आता ,
गाठ पदराला बांधते,
तु उभा सिमेवरी,
भेटण्यास आठवण येते...

