STORYMIRROR

Samadhan Sidhganesh

Inspirational

5.0  

Samadhan Sidhganesh

Inspirational

नक्की येईल दिवस असा..!

नक्की येईल दिवस असा..!

1 min
992



प्रतिज्ञा घेतोस "भारत माझा देश आहे"

मग सांग तुझा हा भारत कसा?

साध्या सोप्या प्रश्नालाही,

का डोळे वटारून बघतोस असा?


वर म्हणताेस टेबला खालून लाच घेताना,

मीच घेतलाय का देशाचा वसा?

मग पुढची पिढी कशी बदलणार?

जर तुझ्याच पिढीचा गोतावळा असा..


कसं सांगणार तुझ्या मुला-बाळांना,

तु ताठ मानेने जगला कसा..

की सांगशील गोर-गरीबांचा पैसा लुबाडून

हा बंगला बांधला मी असा..


पैश्याचा पोलिओे तुला जडल्याने,

अपंगच होऊन गेलाय देश जसा..

मग आत्मसन्मानाचे पाय नसणार्‍याला,

काय फायदा पाजुन लसा..


तु एक पाऊल तर टाक पुढे

मग बघ देश बदलुन जाईल असा..

"भारतमाता की जय" म्हणताना

हा केव्हाच सुकणार नाही घसा..


आणि जर विचारलं येऊन कोणी

की बता,

"तेरा भारत कहाँ है बसा?"

तर अभिमानाने सारे भारतीय,

दाखवतील कापून स्वत:च्या नसा..!


माहीत नाही कधी?

पण नक्की येईल दिवस असा..!


माहीत नाही कधी?

पण नक्की येईल दिवस असा..!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational