नटवरा नमन माझे तुला
नटवरा नमन माझे तुला
1 min
1.0K
गंध नाही फुलांपरी,
रंग नाही नभांपरी..
परी स्वच्छंद या मनाची माळा,
चरणी वाहूनी तुझ्या..
नटवरा नमन माझे तुला
शतश: नमन माझे तुला..!
अमर नाही अमृतापरी,
बाधित नाही विषापरी..
परी निस्वार्थी या देहाची काया,
चरणी झिजवुनी तुझ्या..
नटवरा नमन माझे तुला
शतश: नमन माझे तुला..!
