वाटे जगावसं अजुन थोडं..
वाटे जगावसं अजुन थोडं..
किंमत नव्हती पैशाला
तेव्हा नाती होती सारी गोड..
नोटांचीच सारयांना आता
लागलीया हळवी ओढ..
पैशासाठी माणुस
नातं आई-बापाचही तोडं..
विखरलेल्या आयुष्याचे
झालयं सुटेनासं कोडं..
रंगभुमी पाहुन पुन्हा,
वाटे जगावसं अजुन थोडं..!!
आपले-परके, मित्र-शत्रू
सगळ्यांची मी ओळखली खोडं..
कितीही केलं कोणासाठी
तरी आपल्याच माथी खापर फोडं..
रचुनीया सरण देवा
हा देह स्मशानात सोडं..
अस्तव्यस्त जगण्याला लागे
अशी मरणाची ओढं..
रंगभुमी पाहुन पुन्हा,
वाटे जगावसं अजुन थोडं..!!
रंगभुमी पाहुन पुन्हा,
वाटे जगावसं अजुन थोडं..!!
