मी तुझ्या डोळ्यांनी हे जग पहाव
मी तुझ्या डोळ्यांनी हे जग पहाव
ओळख असुनही आपली,
आज तु अनोळखी वाटलीस..
हातात हात घेऊन माझा,
तुझ्या प्रेमाची शपत घातलीस..
निस्वार्थी प्रेम काय असते,
हे कधीच नाही मला कळालं..
आज पाणावलेल्या तुझ्या डोळ्यात पाहून,
माझ्या प्रशनाच उत्तर मला मिळालं..!
हातात तुझा हात होता,
जणु सुर्य जळुन वाहत होता..
उसळता हा अथांग सागर,
जणु शांत बसुन पाहत होता..
वाटु लागले क्षणोक्षणी मग,
हे असचं सारं स्थिर रहावं..
डोळ माझेे मिटेपर्यंत,
मी तुझ्या डोळ्यांनी हे जग पहावं..!
डोळ माझेे मिटेपर्यंत,
मी तुझ्या डोळ्यांनी हे जग पहावं..!
