नका रे मारु कुठारी
नका रे मारु कुठारी
दिन आगळे सळसळण्याचे
मस्त धुंदीमधे बहरण्याचे
उंच आकाशी झेपावण्याचे
मित्रद्वयांसवे खेळण्याचे
वसुधा हसत झुलायची
वृक्षवेलींसवे खुलायची
पर्ण फुले फळे डुलायची
सृष्टी तथास्तुची म्हणायची
न जाणे कुणाची नजर लागे
जंगलतोड व्हायला लागे
लागे घाव आमच्या जिव्हारी
फांदीला फांदी हळू बिलगे
उठली जंगले सिंमेंटची
इमारती हो टोलेजंगची
कसातरी मी उभा ठाकलो
फांदीला सवे घेऊन साची
जीव आहे हो वृक्षवल्लींना
कुठारी नको वर्मस्थानांना
पर्यावरणी येतसे कामा
महत्व आमुचे मनी जाणा
