Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Subhash Charude

Romance

3  

Subhash Charude

Romance

नजर

नजर

1 min
6.7K


सर्वत्र चाललाय नजरे नजरेचा खेळ

मनातील भावनांचा होतो नजरेतून मेळ

कुणी म्हणती नजर लागली नजर काढा

यावर पडलाय नजरेचा वेढा

नजरेची ताकद बघा किती मोठी

यातूनच घडते समस्या मोठी आणि छोटी

कोणी कोणाला देईना आता इथे वेळ

सर्वत्र चाललाय नजरे नजरेचा खेळ

नजर ना लागो म्हणून

लावतात काजळाचे बोट

न जाणो मनी कुणाच्या काय आहे खोट

नजरेतूनच घडतात मनाच्या भेटी व गाठी

एक नजरच खूप आहे मनाच्या आधारासाठी

जेव्हा बसत नाही कुणाचा जीवनी ताळमेळ

सर्वत्र चाललाय नजरे नजरेचा खेळ

कुणा पाहुन कुणी नजर चोरुन घेतो

नजरेसाठीच जीव कसा कासावीस होतो

जेव्हा खूप होते मनात वेदनांची दाटी

तेव्हा नजरच करून देते वाट अश्रूंसाठी

कधी नजरेलाच मिळत नाही नजरेसाठी वेळ

सर्वत्र चाललाय नजरे नजरेचा खेळ


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance