नजर
नजर
नयन तुझे जादू भरे
नजर नजरेस खिळवणारी
घायाळ करी प्राण माझा
नजर नजरेस भेदणारी
जीवन जगण्यास सार्थ
नजर नजरेस भुलवणारी
जादूभऱ्या दुनियेत माझ्या
नजर तुज उतरवणारी
तुझ्या नयनांचे हास्य
नजरेत माझ्या खुलवणारी
तुझ्या-माझ्या प्रीतीत
नजर मोहक रंग भरणारी
आतूर तुज भेटण्या मी
नजरेत ही आस जागवणारी
थेट भिडे काळजात मग
नजर श्वासात मिसळणारी
जीवनाच्या अंतापर्यंत
नजर ह्रदयीचा ठाव घेणारी
जगण्याच्या शर्यतीत मला
तुझी नजर बळ देणारी
तुझी-माझी नजरा-नजर
एक होवो एकदातरी
हीच आस जागवली
तुझ्या नजरेने अंतरी