मी गात राहिले
मी गात राहिले
मला न कुणाचे भान राहिले
मनात जे आले, मी गात राहिले
लोक काय म्हणतील हे ना पाहिले,
मी प्रेम फक्त तुझ्याशीच केले
तुझ्यासाठी मी तर राहतो उदास,
उधळून टाकू फुलांचा सुहास
तुझे रूप माझ्या भावले,
मनात जे आले मी गात राहिले
एक भावना लागे असे थरारूनी,
तुझ्या नि माझ्या दोघांच्या मनी
डोळ्यात तुझीया सावन कसा,
हे प्रेम माझे जुळले पावन कसा
दिवसाही स्वप्न पाहात राहिले,
मनात जे आले मी गात राहिले
निळ्या नभातून निळसर काया,
अंगांगावर तुझ्या निळसर माया
नकोस येऊ तू चंद्रापुढती,
थांब जरासी क्षितिजावरती
वाट वेळेची पाहात राहिले,
मनात जे आले मी गात राहिले
वेळीच येई शीळ तुझी ती,
परी उरी या अबोध भीती
वाट चालूनी शिणली तुझी काया,
स्वरही नमले काही बोलाया
भेटशील तू मला तोवरी पाहिले,
मनात जे आले मी गात राहिले
मनात जे आले मी गात राहिले

