STORYMIRROR

Jayshri Dani

Romance

4  

Jayshri Dani

Romance

नितळ

नितळ

1 min
309

मला साहताना

तुझाच किनारा

कोवळा नितळ

फुलपाखराच्या

इवल्या जीवाने

चुंबियेला तळ 


निराकार स्वल्प

झुंजुमुंजू वेळ

सृजनास बळ

पंचप्राण पाखी

ठेवतसे ओले

आंतरिक वळ


अनंताचे दीप 

तेजाळून याया

कैवल्यास गळ

तसे तळपणे

मनस्वी घडाया

माझ्यात वितळ


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance