STORYMIRROR

Pradnya Vaze-Gharpure

Abstract

4  

Pradnya Vaze-Gharpure

Abstract

निसर्ग

निसर्ग

1 min
432

जल समंध रात्रींत पिऊनी, 

जननी नखशिखांत ओली

उरल्या सुरल्या वैशाखाला 

विरहिणी सुखावून गेली।


ह्या पहाटवाऱ्यांमधुनी 

घन थंडीचाच निवार

तो निश्चल स्पर्शूनी दुरुनी, 

मनी भरतो शेंदरी गुलाल


जरी विषण्ण थंड ती झाली

तरी पोटी आर्त तहान

उरी गजर गजर किती प्रभूचा

उद्धराया, काळ तो फार


आणि लवली जशी पापणी

तशी उजळूनी गेली पार

की हरखुनी हिरवी नव्हाळी

तेजाळी शुद्ध समाधान।


तेजाळी शुद्ध समाधान।

तेजाळी फक्त समाधान।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract