STORYMIRROR

Pradnya Vaze-Gharpure

Others

4  

Pradnya Vaze-Gharpure

Others

प्रेम म्हणजे...

प्रेम म्हणजे...

1 min
430

तू म्हणतोस ती चेतना आहे, जशी पहाटेची जाग

तेच आहे माझ्यासाठी, तुझ्या-माझ्यातला संवाद


तुझ्या-माझ्यातला संवाद जो शब्दांवाचून होतो

मन-मनाशी एकरूप झालं, की असंच म्हणे होतं!


प्रेम माझ्यासाठी सहजीवन, पण तू शिकवला त्याग

आपली परिभाषा एक व्हावी, असाच तर हा याग


प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे.. निव्वळ आंनद एकरूपतेचा

प्रत्येक सुखी संसारातून डोकावणारा, तुझ्या-माझ्या समाधानाचा


प्रेम म्हणजे तू! अरे, प्रेम म्हणजे मी…!

जाणिवांपार निरंतर धावणारी ती आपल्यातली पावन नदी


Rate this content
Log in