प्रेम म्हणजे..
प्रेम म्हणजे..
तू म्हणतोस जागा आहे, तू म्हणतो तो शुद्ध राग
प्रेम म्हणजे माझ्यासाठी, तुझ्या-माझ्यातला संवाद
तुझ्या-माझ्यातला संवाद जो शब्दांवाचून होतो
मन-मनाशी एकरूप झालं, की असंच म्हणे होतं!
प्रेम माझ्यासाठी सहजीवन, पण तू शिकवलाय त्याग
आपली परिभाषा एक व्हावी, असाच तर हा याग
प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे.. निव्वळ आनंद एकरूपतेचा
प्रत्येक सुखी संसारातून डोकावणारा, तुझ्या-माझ्या समाधानाचा
प्रेम म्हणजे तू अरे, प्रेम म्हणजे मी..
जाणिवांपार धावणारी आपल्यातली चिरंतन नदी

