STORYMIRROR

Savita Kale

Abstract

4  

Savita Kale

Abstract

निसर्ग

निसर्ग

1 min
507

हिरवा शालू लेऊन

नटली ही वसुंधरा

सौंदर्याची खाण दडली

सृष्टीच्या चराचरा


फुलांचा मोहक रंग पाहुनी

भ्रमर होई दंग

निरभ्र आकाशी स्वैर होऊनी

मजेत उडे विहंग


आली वर्षा धरणीवरी

मग न्हाऊनी निघे सृष्टी सारी

झाडा-वेलींचे सौंदर्य खुले

रूप न्याहाळे दुनिया सारी


आकाशीचा सखा चांदवा

रमे त्यासवे रम्य चांदण्या

रवी राजा तो रोज उगवे

प्रकाश अन् उजेड देण्या


अनेक रूपे रंग घेऊनी

निसर्गराजा सजला

सौंदर्याचा अर्थ खरा तो

आज उमगे मजला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract