निसर्ग कविता
निसर्ग कविता
आसमंती जादू झाली
निसर्ग बहरून आला,
मनमुराद हर्ष आस्वाद
जीवनी सुख वर्षाव झाला.
भोवताली हिरवाईने
शृंगार साज चढवला,
नजरेस अशी धुंदी येता
भास सौख्यदायी केला.
स्वर्ग जणू आज भूवरी
नकळतच अवतरला,
आनंदाचा सोहळा असा
मनामनांत साजरा झाला.
चहू दिशांनी बहरून आला
निसर्ग सोळा शृंगारांनी,
मनांत माझ्या सुखकल्लोळ
सौख्यचित्र नवे रेखूनी...
