STORYMIRROR

pooja thube

Abstract

4  

pooja thube

Abstract

निसर्ग आपला बाप

निसर्ग आपला बाप

1 min
548

निसर्गात रमावे 

येथेच्छ बागडावे

आहे बाप तो आपला

मनसोक्त येथे दौडावे 


फळे फुले छाया

देती वृक्ष

माणसाला पोसले त्यांनी

आहे सारे साक्ष


प्राणी कधी निसर्गापासून

दूर जातात का

आपल्याच बापाला पोरे

कधी परके होतात का 


निसर्गाचा करून ऱ्हास 

काय मिळणार मानवा

निसर्गातून आलो निसर्गात जाणार

अर्थ हा जाणावा 


नको वृक्षतोड 

नको काँक्रेटचे जंगल

लावूनी झाडे

वातावरण करू मंगल 


येईल मग दरवर्षी 

पाऊस भरपूर 

आबादीआबाद सारी नि

आनंदाचा महापूर  


पूजा करा निसर्गाची

जपून त्याला जन्मभर

मरेपर्यंत पुरेल तो

काळजी नको आयुष्यभर  


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract