Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Savita Jadhav

Inspirational

3  

Savita Jadhav

Inspirational

निसर्ग आणि मानव

निसर्ग आणि मानव

1 min
162


🌿🌾🌿🌾🌿🌾🌿🌾🌿

निसर्गाच्या कुशीत रमतं

माणसाचं वेडं मन,

तरीसुद्धा राहिना भान त्याला

निसर्गसंपत्ती हे मोलाचं धन.

🌿🌾🌿🌾🌿🌾🌿🌾🌿

निसर्गाच्या किमया अनेक

आयुष्यभराची ठरे शिदोरी,

मानव त्याच्या स्वर्थासाठी

करीतसे निसर्गाशी शिरजोरी.

🌿🌾🌿🌾🌿🌾🌿🌾🌿

पशूपक्षी, प्राणी, नद्या, झरे, सागर

सारे निसर्गातील घटक अविभाज्य,

दुर्लक्षित अन् प्रदूषित करून 

मानव गाजवू लागला अधिराज्य.

🌿🌾🌿🌾🌿🌾🌿🌾🌿

निसर्ग चक्र लागले आहे

उलट्या दिशेने फिरायला,

ऋतूमानामधे बदल घडतोय

लागतोय विनाशाचा सामना करायला.

🌿🌾🌿🌾🌿🌾🌿🌾🌿

आता तरी सावर माणसा

करूया निसर्ग संपदेचं संवर्धन,

भविष्यात निरोगी आयुष्य जगण्यासाठी

निसर्गाचं देणं जपू या सारेजण.

🌿🌾🌿🌾🌿🌾🌿🌾🌿


Rate this content
Log in