Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Latika Choudhary

Inspirational Classics

3  

Latika Choudhary

Inspirational Classics

निर्वंश

निर्वंश

2 mins
14K


हे तथाकथित विद्वान भविष्यवेत्त्या.....,

नवऱ्याच्या पायातल्या 'शनी' ची नस बाईच्या

हातातील प्रेमळ 'शुक्राने' दाबली असता

धनप्राप्ती होतेय म्हणतोस....?

अरे व्वा ! 'दे रे हरी,पलंगावरी....'

छानच की ! नवऱ्याला काहीच...काहीच

करायची गरज नाही?

बायकोने पाय चेपत बसावे.....धनच धन रे भो !

  ........

मग ,असे असेल तर दे पुरुषाची अशी नस

बायकोच्या हातात.....जी नस आणते

नवऱ्याच्या मेंदूत अमानवी thoughts असे की.....

- स्त्री ही दुय्यम, दासी,अबला,खाजगी मालमत्ता

  आहे सांगणारी.....

-पुरुषानं लुच्चेगिरी,लांडी लबाडी,धोका करणं

 हक्क समजणारी........

-नवरा मेला ....गेला तर 'ती' ने धरावा कोनाडा

 ,कोपरा कुजलेला ,पाळावी बंधने नीतिनियम, बसावे बुरसटल्या

 परंपरा कुरवाळत.....

 अन...बायको गेली तर नवऱ्यानं दसव्याच्या

 विधितच उरकावा विधी नव्या बायकोचा.....!

हे भविष्यवेत्त्या...तुझे भविष्य, तुझी तरी 'नस' तुला

 सापडली का तुझ्या बायकोच्या हातात देण्या

 साठी.....जी नस....

 -'ती' चा होकार...नकार...आवड... नावड...

 मान...सन्मान...मन...मत डावलत...

 स्वतःच्या ईच्छा ,वासना, विकृती, व्यसन वेचत

 स्वतः 'जगत', 'ती' ला क्षणोक्षणी मारणारी....

- 'ती' सहनशील, आदर्श, पवित्र असावी ही

 अपेक्षा ठेवत स्वतः मात्र शोधत राहतो 'शिकार'

 'सावज ' ..... 'शाव' बनत आणतो आव....

 विसरत नाव ,गाव....

-घरामध्ये सुरक्षिततेच्या नावाखाली 'ती' ला

 डांबून ठेवणारा तू मनुवादी 

 स्वतः मात्र विनाब्रेक च्या वाहनासमान निरंकुश

 ........?

 सोशिकता , उपेक्षेचे जोखड झुगारणारी 'ती'

 देत राहते लढा आंधळ्या न्यायदेवतेशी.....!

हे हलकट मनुवंशजा....भविष्यवेत्त्या......,

द्रष्टा म्हणवून घेतोस....मग

पाहत का नाही तुझी दृष्टी ,तुझ्या....खालचा

अंधार ...घाण ..किडे मेंदूतले ..मनातले ..

आचार....विचारातले ....?

देहशुचितेच्या गोष्टी करणारा तू .....

ओरबाडत राहतो देह ...वस्त्र...इज्जत..अब्रू...

'नजरेने' तुझ्या अन .........

झाकत राहतो सर्वांग बायकोचे

ती 'आपली' ,'पवित्र' रहावी म्हणून.....!

उपकाराचे ओझे लादत... मोबदला न

मिळाला तर 'बदला' घेणारा तू

 हाती न आली तर जोडत राहतो नाव दुसऱ्यांशी ...करत बदनामी ....उत्पीडन...

 दमन.....हवन तिच्या सर्वस्वाचे.....!

 

हे स्वार्थी मनूच्या बिजवाहका......

पुरूषाच्या लढाईतली 'लक्ष्य ' तिला करीत ,सुडबुद्धी

ठेवणारा ... बाईल.....षंढ तू....

थांबव आता तुझा समाजात सभ्यतेचा बुरखा

घालून वावर.....अन संधी मिळताच बुरखा

फाडून वासनांध होणे.....!

थांब...

थांबच......कारण 

डागाळली आहेस तू फुले. .शाहू ..बाबासाहेब

यांची 'माणुसपणाची' वाट.....वहिवाट 

सावित्रीला संधी देणारी....जननी...जन्म..जीणे

सार्थ करणारी.....!

 

म्हणूनच हे मनुदास....बेलगाम भविष्यवेत्त्या,

थांबच तू........

अन्यथा .....

आता तिच्यातली 'ती' जागली आहे,उठली आहे....पेटली आहे

घेतले आहे कवेत तिने आकाश,

तोडले आहेत तुझे बंध अन पाश......

सावर .....सावर आतातरी तूच तुला......

कारण .....

सापडली आहे तिला तुझी 'नस'. ...

धन देणारीच नव्हे तर तुला

मन, मत ,भान ,जाण देणारी अन कुवत

दावणारीही.......

आवर तूच तुला आता, कारण...

ओळखले आहे तिने की.....

तिचे श्वास... स्वप्न...हुंदके.. विचार...क्षमता

पदाखाली..... परंपरेखाली दाबून ठेवणारा तू

तिला वस्तू .... विनोद बनवत

स्वतः विनोद होत जाणारा...

क्षणोक्षणी रंग बदलणारा...बेरंग...अपंग...'अधू

च तिच्याशिवाय' हेच सत्य....जरी असले विदारक..विखारी ..जाचक...बोचक....कटू

पण......सुर्यप्रकाशाकाईतके प्रखर......!

आणि चालणे,बोलणे,जगणेही अशक्य 'ती'च्या

शिवाय हे माहीत असूनही 'मर्दानगी' चा नाटकी

आव आणणारा 'षंढ' तू.... मानत असतो मोठेपणा

तिला हतबल करण्यात....!

आणि म्हणून सांगते....थांब ...

थांब ,आणि ओळख रग.. धग.. तग ..जग तिचे...

......ओळख तीच कारण तुझ्या 'सकाळ'...

'दुपार'...'संध्याकाळ' फुलवण्याला ....

जन्म...मृत्यूस सुद्धा.....!

ओळख तिचे तेज ....ओज... क्रोध....लाव्हा

जो आज सळसळतोय....खवळतोय....

उसळतोय....'शस्त्र' देण्या हाती तिच्या

तुझ्यासारख्या भविष्यवेत्त्याची बांडगुळी

तमाम पिलावळीची कत्तल करण्यासाठी....!

             खात्मा करण्यासाठी....!!

निर्वंश करण्यासाठी .....!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational