STORYMIRROR

Jayesh Madhav

Tragedy

3  

Jayesh Madhav

Tragedy

निरूत्सव

निरूत्सव

1 min
241

रंगातील रंगच आता

खूप मलिन झाले आहेत

उत्सव उत्सव राहीले नाहीत

ते निरूत्सव झाले आहेत


एका साध्या महामारीने

हे काय करून ठेवले आहे

रक्त आटवून कमवलेले

आता सगळे गमावून झाले आहे


धरती आकाश चराचर

सारेच निस्तेज झाले आहेत

सगळेच परस्परांवर

आज नाराज झाले आहेत


हवेची एक झुळूकही

वादळासम वाटू लागली आहे

माणसाला पाहून माणूसही

आता घाबरू लागला आहे


सगळेच जण संकटात

संधी शोधू पहात आहेत

जगण्यासाठी काहीही

करायला तयार झाले आहेत


निसर्गाची हवी तशी

मोडतोड करून झाली आहे

माणसाने सभ्यतेच्या

सीमा पार केल्या आहेत


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy