STORYMIRROR

Sangita Pawar

Inspirational

3  

Sangita Pawar

Inspirational

निरोप

निरोप

1 min
232

गणपती होते घरी

वाहे चैतन्याचे वारे

दहा दिन कसे गेले

सुनी सुनी होती दारे ||


निरोपाचा आज क्षण

येती बाप्पा आठवणी

किती होती आरासही

मनी सर्व साठवणी||


निरोपही बाप्पा देऊ

भकासही वाटे घर

आसनही रिकामेसे

ओघळते डोळी सर ||


घर झाले आता खाली

देतो निरोपही त्याला

सहवास होता तुझा

आत्ता कंठही दाटला ||


निरोपही आनंदाने

विषाणूंचा नाश कर

घेऊ मोकळाही श्वास

प्रतिकार शक्ती भर ||


गणपती चाललेही

प्रेमानेही त्यांच्या गावा

चुकलेही माफ कर

निरोपही त्यांचा घ्यावा ||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational