STORYMIRROR

Suhas Bokare

Tragedy

3  

Suhas Bokare

Tragedy

निरोप

निरोप

1 min
265

काल तू आलास जेव्हा तो जरी आभास होता

एकट्याने जीवनाचा अर्थ संपायास होता


लागली आताच हाती रात्र ही अंधारलेली 

त्याच हाती मोडलेला आपला आरास होता!


सोडते प्राणास आता लागला भासायला तू 

न्यायलाही तूच येशी हा मला विश्वास होता 


जीवना प्रेमात का रे मांडले ते न्यास तेव्हा?

जोडप्या ला जोड आता जो अर्थ नात्यास होता


भावना विश्वात माझ्या झाकले भारूड सारे.

मुक्त आता श्वास झाले काल कारावास होता


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy