STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

निरोप बाप्पाला

निरोप बाप्पाला

1 min
293

येता क्षण निरोपाचा

गहिवरे भक्त मन

दहा दिवस सोहळा

झाला आजच संपन्न  (१)


पूजा षोडषोपचारे

रास असे मोदकांची

आज उदासले मन

बाप्पा चालले घरासी   (२)


होता आरती देवाची

भक्त गजर करती

गणेशाला आळवुनी

झणी येण्या विनवती  (३)


बाप्पा चालले घराला

चैन पडेना आम्हांला 

दहा दिनांचा सोहळा

आज संपन्न जाहला   (४)


पुनरागमनायच

भक्त त्रिवार सांगती

देव वळून बघती

भक्तां आशिर्वच देती   (५)


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract